एकीकडे विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर प्रचार, आवाहन आणि टीकेचा पैसा पडतोय सध्या राजकारणात राजकीय पक्षांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर गलिच्छ भाषेचा वापर करत हल्ले केले जात आहेत व मनसेने या विरोधात आवाज उठवला आहे.
Aghadi Bighadi, Aham Bhrashtrami, भ्रष्टवादी पार्टी, पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ आणि हाताची घडी तोंडावर बोट हे फेसबुक पेजेस विधानसभेचे बिगुल वाजण्या पूर्वी नुकतेच चालू करण्यात आले होते. या पेजेसवरून विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर बेलगाम हल्ले केले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट आणि मजकूर टाकणं या पेजला कदाचित महागात पडणार असं दिसतंय.
मीडिया न्यूज नुसार हे सर्वच फेसबुक पेजेस मागील काही महिन्यात फेसबुकवर लाखो रुपय खर्च करून बनवण्यात आले आहेत व आता गरळ ओकत लोकांच्या भावना दुखावत आहेत. या पेजवरील पोस्टमुळे समाज विघातक अपशब्द वापरून विरोधी पक्षातील नेत्यांवर विशेषत: राज ठाकरेंवर लिखाण करुन कार्यकर्त्यांच्याही भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे संबंधितांवर ताबडतोब योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. जर लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने पाहू असे मनसेकरांचे आव्हान आहे. आता यावर निवडणूक आयोग काही कारवाई करणार का यावर लक्ष वेधले आहे.