Home महाराष्ट्र युती तुटल्यानंतर मोदी आणि ठाकरे काल आले पहिल्यांदा आमनेसामने…

युती तुटल्यानंतर मोदी आणि ठाकरे काल आले पहिल्यांदा आमनेसामने…

0

सत्तेसाठी अनेक दिवस चाललेल्या भाजप-शिवसेना रस्सीखेच मध्ये शेवटी कुणीच माघार न घेतल्याने युती तुटली. पुढे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून सत्ता स्थापन केली आणि बहुमत मिळून सुद्धा भाजपला विरोधी पक्षाची जागा स्वीकारावी लागली. अर्थात भाजप शिवसेनेत आता फारसे समंध चांगले राहिले नाही. युती तुटल्यानंतर काळ प्रथमच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे आमनेसामने आले. काल पुण्यातल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी मोदी पुण्यात आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आले होते त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री शहा, मुख्यमंत्री ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

मीडिया रिपोर्ट नुसार युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. ठरल्याप्रमाणे केवळ स्वागताचे समारंभ उरकुन उद्धव ठाकरे ताबडतोब मुंबईला निघून गेले. मोदी आणि ठाकरे केवळ 10 मिनिटं एकमेकांसोबत होते 10 मिनिटांदरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली याचा याबाबद्दल अद्याप कुहलीही माहिती मिळालेली नाही.