Home महाराष्ट्र मोदींच्या योजनांमध्ये व्यत्यय आणल्यास सरकार उलथविण्यात येईल : फडणवीसांचा इशारा

मोदींच्या योजनांमध्ये व्यत्यय आणल्यास सरकार उलथविण्यात येईल : फडणवीसांचा इशारा

0

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनिमित्त शुक्रवारी अर्थात काल 3 जानेवारी रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धुळे आणि नंदुरबार येथे दौरा केला. दरम्यान या दोन्ही जिल्ह्य़ात त्यांच्या सभा झाल्या असून या सभांमध्ये फडणवीसांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भरभरून टीकाशस्त्राने प्रहार केला. त्यातल्या त्यात त्यांनी शिवसेनेवर विशेष निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, “निवडणुकांमध्ये आमच्यासोबत मते मागितली व आता संसार दुसऱ्यासोबत थाटला. हे बेईमानीने स्थापन केलेले सरकार असून असे सरकार फार काळ टिकत नाही. शिवसेनेने जनतेला धोका दिला आहे” असं ते म्हणाले. सोबतच ‘सरसकट कर्जमाफी’ वरूनही त्यांनी सरकारवर तोफ डागली अशी माहिती लोकसत्ताच्या एका रिपोर्टनुसार मिळत आहे.

या रिपोर्टनुसार फडणवीस यांनी केंद्राच्या योजनांच्या आड येऊ नये असा इशारा देखील दिला. ते म्हणाले, “सरकारच्या प्रकल्पांना येणारा पैसा हा केंद्राकडून येतो म्हणून राज्यात भाजपचे सरकार नसले तरीही प्रकल्पांची कामे थांबणार नाही. कर यात काही आडफाटा आला तर राज्य सरकारच उलथविण्यात येईल” असं फडणवीस म्हणाले.