Home महाराष्ट्र नाशिक मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास...

मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा

0
uddhav-thakre-narendra-modi

नाशिक : नाशिक येथे झालेल्या महाजानदेश यात्रेच्या सांगता प्रसंगी पंतप्रधान मोदी सभेला संबोधून बोलत असताना त्यांनी राम मंदिराचा विषय काढला, यावेळी पंतप्रधान मोदींनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला, यावेळी मोदी म्हणाले, बोल बच्चन बच्चन करणाऱ्यांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा, अयोध्यत राम मंदिर होणं ज्या प्रमाणे तुमची इच्छा आहे, तशीच ती सर्वसामान्य भारतीयांची देखील इच्छा आहे, सुप्रीम कोर्टाच्या मताचा आदर करायला हवा.

या आधी उद्धव ठाकरे यांनी कलम ३७० प्रमाणे अयोध्यत राम मंदिर बांधण्यासाठी लोकसभेत मोदी सरकारने कायदा करावा, म्हणजे राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा होईल, अयोध्या आणि राम मंदिरा वरून या आधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला अनेकदा कात्रीत पकडण्याचा प्रयत्न देखील केलाय, या आधी, उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिरासाठी सभा घेतली होती, नुकतेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी लोकसभेत कायदा करावा आणि हा प्रश्न सोडवावा, असं जाहीर रित्या सांगितलं होतं, हाच धागा पकडत पंतप्रधान मोदी यांनी नाशिक च्या सभेत उद्धव ठाकरे यांना टोला लागवल्याचं बोललं जात आहे.