Home महाराष्ट्र MPSC परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर, राज्यसेवा परीक्षा होणार १ सप्टेंबर रोजी

MPSC परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर, राज्यसेवा परीक्षा होणार १ सप्टेंबर रोजी

0

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कित्येक लोकांची मागणी होती, केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या तारखा जाहीर केल्यानंतर MPSC ने सुदधा पुढे ढकललेल्या तारखांच्या घोषणा केल्या आहेत.

नवीन तारखा पुढीलप्रमाणे:

राज्यसेवा पूर्व परीक्षा – १३ सप्टेंबर,

दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – ११ ऑक्टोबर

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – १ नोव्हेंबर

MPSC चे पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का, याचे नियोजन सुरु होते. तर दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का, याचीही स्थिती जाणून घेतली जात होती. मात्र, डिसेंबरपर्यंत निश्चितपणे एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल, असा विश्वासही उपसचिव कुलकर्णी यांन यावेळी व्यक्त केला होता ,राज्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे दोनदा वेळापत्रक रद्द करावे लागले. तरीही आता युपीएससीचे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागांच्या परीक्षा आहेत का, याचा आढावा घेतला आणि त्यानुसार आता एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.