Home महाराष्ट्र MPSC आयोग सुद्धा Quarantine, आठ महिने झाले तरी अजून मुख्य परीक्षेचा निकाल...

MPSC आयोग सुद्धा Quarantine, आठ महिने झाले तरी अजून मुख्य परीक्षेचा निकाल नाही!

0

२०१९ मध्ये महाराष्ट्र शासनात मेगाभरती होणार म्हणून फार मोठा गाजावाजा करण्यात आला, जाहिराती काढून अर्ज मागविण्यात आले, परीक्षा सुद्धा झाल्या मात्र, निकाल लावण्यास ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा’ला म्हणजेच MPSC ला मुहूर्त मिळत नसल्याने हजारो भावी अधिकाऱ्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १ हजार ९२० पदांसाठी ५ परीक्षा झाल्या, पण असून एकाचाही निकाल लागलेला नाही.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले नशीब पणाला लावून दिवसरात्र मेहनत घेतात पण एखादी परीक्षा होऊन ८ महिने उलटून गेल्यावर तिचा निकाल लागत नसेल तर विद्यार्थ्यांची मनाची परिस्तिथीचा अंदाज लावा. या वर्षी कोरोना संकट मूळे सरकारने जाहीर केले की पुढच्या वर्षी नोकरभरती होणार नाही त्यामुळे आता आधीच नैराश्यात असणाऱ्या मुलांनी करायचे तरी काय हा प्रश्न उभा राहतो.

एमपीएससी’ने ४२० पदांसाठीची ‘राज्य सेवा २०१९’ची मुख्य परीक्षा जुलै महिन्यात घेतली आहे तर त्याच्या मुलाखती फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या. मात्र, निकाल लागलेला नाही. याच प्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, कर सहायक, उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, लिपीक टंकलेखक या पदांची जाहीरात निघाली होती. यात सुमारे ४ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २५ हजार ७२६ जण मुख्य परीक्षेला पात्र ठरले. यांची मुख्य परीक्षा ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आहेत.

परीक्षेचे नाव – पद संख्या – मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी
राज्यसेवा २०१९ – ४२० – १३२६
उपनिरीक्षक उत्पादन शुल्क – ३३ – ८०८
लिपीक टंकलेखक – १७९ – ३६०८
कर सहायक – १२६ – २९५७
विद्युत अभियांत्रिकी सेवा – १६ – २८९
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा – ११४६ – १६,७३८
एकुण – १९२० – २५७२६