कोरोनामुळे राज्य सेवेची पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती आता, ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या मूळे प्रत्येक जिल्हा ठिकाणी असलेल्या कोषागारांमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तशाच पडून आहेत ह्या तशाच ठेवण्यात याव्यात म्हणून mpsc चे सह सचिवांनी २१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मागितली आहे त्यामुळे त्या अगोदर पूर्व परीक्षा होणारचं हे नक्की आहे.
एमपीएससीची परीक्षा ५ एप्रिलला घेण्याचे नियोजन करण्यात आले होते आणि त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयांमधील सुरक्षा कक्षात सीलबंद ठेवलेल्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची मुदत ३१ एप्रिलपर्यंतच होती. मात्र, कोरोनामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याने त्या सुरक्षित राहाव्यात, यादृष्टीने एमपीएससीने मुदतवाढीचे पत्र निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहेत
एमपीएससीने यापूर्वी 420 पदांसाठी राज्येसेची परीक्षा घेतली असून उत्त्पादन शुल्क विभागाच्या 33 उपनिरीक्षक पदांची परीक्षा मागच्या वर्षी झाली आहे. तसेच 179 लिपीक टंकलेखक, 126 कर सहायक, 16 विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि एक हजार 146 स्थापत्य अभियांत्रिकी सेवेची परीक्षा होऊनही निकाल लागलेला नाही. एमपीएससीने तत्काळ निकाल जाहीर करावा म्हणून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री, आमदारांना निवेदने दिली असून ट्विटरवर एमपीएससी रिझल्ट अशी मोहीमही सुरु केली आहे.