Home आरोग्य मुंबईचे ‘वूहान’ होण्याची भीती वाढली, कोरोना बाधित रुग्ण तब्बल ५ हजार लोकांच्या...

मुंबईचे ‘वूहान’ होण्याची भीती वाढली, कोरोना बाधित रुग्ण तब्बल ५ हजार लोकांच्या संपर्कात : राजेश टोपे

0

दिवेसंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. त्यातही सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत. दरम्यान, मुंबईच्या चिंतेत आणखी भर घालणारी आणखी एक बाब समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. “मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. तर मुंबईतील तब्बल ५ हजारापेक्षा अधिक लोक १६२ रुग्णांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आले आहेत,” अशी चिंताजनक माहिती टोपे यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना वॉर रूमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत त्यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही कमीत कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी करत असून. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान मुंबईतील वाढता आकडा मोठी चिंतेची बाब आहे. पुढे हे आव्हान कसं पेलायचं यासंबंदी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिली.

करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत पण त्याचं संक्रमण वाढू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जे लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर पूर्ण बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोकांच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.