महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्र्यांना रेल्वे मंत्रालयासोबत बातचीत करण्यास सांगितले आहे, ठाकरे यांच्या मते मुंबई मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरू केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही.
एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांनी मुंबई लोकलच्या मान्सून तयारीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले असून खासगी दवाखान्यातील डॉक्टरांना सुद्धा पीपीई किट देण्याचे आदेश दिले आहेत, मान्सून मध्ये रोगराईच्या काळात खासगी दवाखाने सुरू करावेच लागणार असल्याचे त्यांनी मत मांडले.
“कोव्हीड १९ चा मृत्यूदर हा ३.३ तर बरे होण्याचा दर ३१% आणल्याचे आपण बोलू शकतो आणि हा आपला छोटा विजय आहे. एप्रिल महिन्यामध्ये ३ दिवस असणारा रुग्ण दुपटीचा कालावधी आपण आता १४ दिवसांवर आणला आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना आदेश देत त्यांनी मुंबईमधील खासगी दवाखान्यातील ऐकून एक रुग्णक्षमतेची माहिती देण्यास सांगितले तसेच एक स्वतंत्र डॅशबोर्ड यंत्रणा अद्यावत माहितीनिशी सुरू करावी असे ते म्हणाले.