आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असतांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करीत आहेत. दरम्यान त्यांच्या मतदारसंघांतील बहुभाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य यांनी परप्रांतीयांच्या मातृभाषेचा वापर केला होता. यामुळे आता लोकांना प्रश्न पडला आहे की मराठी अस्मितेसाठी आग्रही असणाऱ्या ठाकरे कुटुंबीयातील आदित्यला महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात मुंबईत प्रचारासाठी मराठी शिवाय इतर भाषेचा वापर का करावा लागतोय? या मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान बाळगणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत तर सोशल मीडियावरही या गोष्टीची चेष्टा केली जात होती. मात्र आता सर्व बॅनर उतरवण्यात आले आहेत.
मीडिया न्यूज नुसार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरेंनी वरळीच्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘केम छो वरली!’ असे फलक ठिकठिकाणी लावले. परिणामी सोशल मीडियावर याचं भांडवल करून आदित्य यांना ट्रोल केलं जातं आहे. अर्थात मराठी माणसाच्या भावना आणि अस्मिता जपणाऱ्या शिवसेने कडून आणि महत्वाचं म्हणजे पक्षाध्यक्षाच्या मुलाकडून लोकांना ही अपेक्षा मुळीच नव्हती. लोकांचा सोशल मिडीया वरील संताप पाहता सर्व बॅनर उतरवण्यात आले आहेत.