Home आध्यात्मिक बाप्पांच्या विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज.

बाप्पांच्या विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज.

0

दहा दिवस बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यानंतर मंगळवारी त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पोलीस नेहमी प्रमाणे सज्ज झाले आहे. त्यांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.

संबंधित परिसरातील पोलिस व अधिकारी त्या परिसरातील विसर्जनावर लक्ष ठेवणार आहेत. तसेच शहराच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सोबतच केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या जागोजागी तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

शहरात लावलेल्या ५ हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण शहरावर नजर असणार आहे. यासोबतच प्रत्येक विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांमार्फ़त जलतरणपट्टू तसेच तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने बोटी, लॉन्चेस उपलब्ध करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांनी राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हील डिफेन्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वाहतूक पोलीस जवान रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून तैनात ठेवले आहेत. तसेच सर्व नागरिकांना शांततेने आणि नियमांचे पालन करत बाप्पाचे विसर्जन करण्याचे आव्हान मुंबई पोलिसांनी केले आहे.