Home महाराष्ट्र औरंगाबाद भाजपचे उदयनराजे, पंकजाताई पिछाडीवर; विधानसभा निकालाच्या ठळक घडामोडी…

भाजपचे उदयनराजे, पंकजाताई पिछाडीवर; विधानसभा निकालाच्या ठळक घडामोडी…

0

राज्यात तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची ओढ संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. आज निकालाचा दिवस असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हळूहळू एकेका मतदारसंघातील आघाडी पिछाडीची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काही ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे:
◆ भाजप ७५ मतदारसंघात, शिवसेना ४७ मतदारसंघात तर राष्ट्रवादी ४३ मतदारसंघात आघाडीवर
◆ परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आघाडीवर, भाजपच्या पंकजा मुंडे पिछाडीवर
◆ साताऱ्यात भाजपचे उदयनराजे तब्बल १४००० मतांनी पिछाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आघाडीवर
◆ बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार ३० हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर
◆ वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे ६ हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर
◆ कोथरूड मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर
◆ औरंगाबाद मध्य व पश्चिम मतदारसंघात शिवसेना आघाडीवर, औरंगाबाद पूर्वमध्ये AIMIM आघाडीवर

राज्यभरात भाजप जरी आघाडीवर असले तरी भाजपचे बरेच दिग्गज नेते पिछाडीवर आहेत असे दिसून येत आहे. मतमोजणी अजूनही शिल्लक असून महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हाती जाईल हे वेळच सांगेल.