Home महाराष्ट्र मुंबई मनसे कडून स्वस्त दरात कांदे वाटप : नागरिकांनी खरेदीसाठी केली प्रचंड गर्दी

मनसे कडून स्वस्त दरात कांदे वाटप : नागरिकांनी खरेदीसाठी केली प्रचंड गर्दी

0

यंदा ओल्या दुष्काळाने शेतीमालाचं खूप नुकसान झालं. परिणामी मागील काही दिवसापासून कांद्याचे भाव आभाळाला भिडले आहेत. जो कांदा बाजपेठेत वाजवी दरात मिळायचा तोच कांदा 100-150 रुपये किलो दराच्या पुढे निघून गेला आहे. दरम्यान अनेक सर्वसामान्य व मध्यम वर्गीय लोकांनी कांदा विकत घेणंच सोडलं आहे. म्हणूनच सर्वसामान्य माणसांनाही कांदा मिळावा यासाठी मनसेने नवी मुंबईत स्वस्त दरात 1000 किलो कांदे वाटप केलं.

बुधवारी नवी मुंबईतील सानपाडा येथे मनसेचे सुरेश मढवी यांच्या वाढदिवसानिमित्त 40 रुपये प्रतिकिलो दराने 1000 किलो कांद्याचे वाटप केले. या मनसेच्या उपक्रमाला सानपाडाच्या नागरिकांनी भरभरून गर्दी केली आणि स्वस्त दरातील कांद्याचा लाभ घेतला. या उपक्रमात मनसेचे इतर नेते देखील आवर्जून उपस्तीत होते. राज्यात आता नवीन कांदा आला असून बाजार पेठेत उतरताच कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट नुसार काही प्रमाणात कांद्याचे भाव उतरले असून अजून बऱ्याच किमती कमी होण्याची शक्यता आहे.