Home महाराष्ट्र मुंबई एनसीबीचे ऑफिस असलेल्या मुंबईतील बिल्डिंगला आग! आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.

एनसीबीचे ऑफिस असलेल्या मुंबईतील बिल्डिंगला आग! आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.

0

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणात तपास करत असल्याने केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक रहात एनसीबी ही संस्था बरीच चर्चेत आली आहे. या संस्थेचे ऑफिस मुंबईतील फोर्ट परिसरातील एक्सचेंज या बिल्डिंगमध्ये आहे. या बिल्डिंगला आग लागल्याची बातमी समोर आली आहे.

सध्या ही आग विझवण्याचे काम शर्थीने चालू असून आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल व रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. या आगीत जीवितहानी झाल्याचे अद्याप तरी कोणत्याही वृत्तात नमूद केलेले नाही. आग लागलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एनसीबीचे ऑफिस आहे. मात्र आग दुसऱ्या मजल्यावर लागली असल्याने एनसीबीच्या ऑफिसमधील कुठल्याही कागदपत्रांचे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात चालू असलेल्या चौकशीत एनसीबीने बॉलिवूड मधील अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याच ऑफीसमध्ये आहेत. म्हणूनच ही आग लावली गेली असू शकते अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. परंतु आगीचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.