बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये साजरा केला जाणारा छटपूजा उत्सव यावर्षी २० व २१ नोव्हेंबरला होणार आहे. हा उत्सव मुंबईतही गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जातो. मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी उत्तरभारतीय लोक हजारोंच्या संख्येने जमतात आणि हा उत्सव साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट ओढवले असल्याने मुंबई महापालिकेने काही निर्बंध लावले आहे.
महाराष्ट्र टाइम्सच्या मीडिया न्यूजनुसार मुंबई महापालिकेने समुद्रकिनारी, नदीकिनारी तसेच तलावांच्या काठी छटपूजा उत्सव साजरा करण्यास सक्त मनाई केली आहे. अशा सार्वजनिक ठिकाणांवर उत्सव साजरा केल्यास मोठ्या प्रमाणावर लोक जमा होतील व परिणामी सामाजिक विलगीकरणाचे नियम मोडले जातील ज्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यताही वाढेल. म्हणूनच महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी छटपूजा उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे.