Home महाराष्ट्र मुंबई धारावीतील यशस्वी कोरोना नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक

धारावीतील यशस्वी कोरोना नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक

0

जागतिक आरोग्य संघटनेने महाराष्ट्र सरकारवर कौतुकाची थाप दिली असून धारावी मध्ये कोरोना विरुद्ध दिलेल्या यशस्वी लढ्यासाठी उल्लेखनीय छाप पाडल्याचे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष टेड्रेस घेब्रेसिस म्हणाले की, ” काही देशांमध्ये कोरोनाचा तडाखा कितीही तीव्र असला तरी सुद्धा आपल्या अथक परिश्रमाने त्यांनी या विषाणू वर नियंत्रण मिळवले आहे, मुंबईतील अतिशय दाटीवाटीच्या वस्तीमध्ये मिळवलेले नियंत्रण उल्लेखनीय आहे”.

संघटनेचे अध्यक्ष पूढे म्हणाले की, ” ह्या विषाणूवर नियंत्रण करण्यासाठी सामुदायिक सहभाग, जास्तीत जास्त चाचण्या, जलद रुग्ण आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम, आजारी पडलेल्यांचे विलगिकरण आणि त्यांच्यावर उपचार ह्या सूत्रांनीच कोरोना वर नियंत्रण मिळवता येते. धारावी प्रमाणेच इटली, स्पेन, साऊथ कोरिया या देशांनी हे दाखवून दिले आहे”.

धारावी मधील प्रशासनाला अजूनही भेडसावणाऱ्या समस्या

धारावी मधील ८०% जनता ही आजूनसुद्धा सार्वजनिक शौचालयावर अवलंबून आहे.

एका १०X१० च्या खोलीमध्ये जवळ जवळ ८ ते १० लोक रहातात. आणि घरासमोर फक्त एक माणूस एका वेळी जाऊ शकेल असे रस्ते.

प्रशासनाने जून शेवटपर्यंत धारावि मधील कोरोना वाढीचा दर १% कसा करता येईल याकडे आता लक्ष वळवले आहे.