Home महाराष्ट्र राष्ट्रवादीला होऊ शकतो डबल फायदा ; राज्यासह केंद्रातही मंत्रिपद

राष्ट्रवादीला होऊ शकतो डबल फायदा ; राज्यासह केंद्रातही मंत्रिपद

0

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच कौतुक केलं परिणामी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चेला उधाण आलं आहे. भाजप पक्षाचे नेते खासगीत म्हणाले की,  “सत्तेसाठी भाजपचा प्लॅन बी तयार आहे,  भाजपचे १०५ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. त्यांचे संख्याबळ १५९ होते, शिवाय भाजपला लहान पक्ष व अपक्ष अशा १४ आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ १७३ होते. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते.”

मीडिया न्यूज नुसार सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्यास त्यांना उपमुख्यमंत्रिपद व १५ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, शिवाय केंद्रात एकवा दोन मंत्रिपदे दिली जातील. भाजपला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीतील एक गट बाहेर पडून भाजपसोबत जाईल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.