ठाकरे सरकार महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये मुस्लिमांसाठी ५% आरक्षण लागू करणार आहे. आज एका मीडियाला प्रश्नाचे उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली आहे,” या संदर्भातील विधेयक लवकरच पारित करण्यात येईल” असे ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेेत शाळांचे प्रवेश सुरू होण्याआधीच यावर निर्णय घेण्यात येईल.
मुस्लिम आरक्षणविषयी तारांकित प्रश्न काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी विचारला होता.पण नवाब मलिक यांच्या घोषणेनंतर लगेचच नागरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले. “महाविकास आघाडीचे सर्व नेते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचारविनिमय करून या संबंधी निर्णय घेतील” असे ते म्हणाले. नवाब मलिक म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिमांसाठी ५% आरक्षण मंजूर केले आहे.”
मात्र भाजप- शिवसेना सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मान्य करत मुस्लिम आरक्षणाचा निर्णय फेटाळून लावला होता.