गेल्या तब्बल ७ महिन्यांपासून सुरु असलेले लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. ही अनलॉकची प्रक्रिया आता पाचव्या टप्प्यात असून या टप्प्यात शिथिल करण्यात आलेल्या निर्बंधांची यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. यासंबंधातील परिपत्रक सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबर अर्थात गुरुवारपासून मेट्रो सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. तर मुंबई लोकल मात्र अजूनही बंदच असणार आहेत. याशिवाय ग्रंथालये खुली करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. शाळा, कॉलेजेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार असून शिक्षकांना ५०% उपस्थित राहावे लागणार आहे.
लोकसत्ताच्या मीडिया न्यूजनुसार आता कंटेनमेन्ट झोन वगळता आठवडी बाजार भरवण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. तसेच प्रार्थनास्थळे सुरु होणार कि नाही याबद्दल या परिपत्रकात कुठलीच नोंद नाही. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून केवळ मेट्रो रेल्वे, ग्रंथालये, आठवडी बाजार सुरु होणार आहेत. शिवाय दुकानांना सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत उघडे ठेवण्यास मान्यता मिळाली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या या सर्व क्षेत्रांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.