छत्रपती फाऊंडेशन आयोजित न्यूयॉर्क शहरातील शिवजयंती महोत्सवाचे यंदाचे हे ७ वे वर्ष.
अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावास “जय भवानी, जय शिवाजी” च्या सूरात न्हाऊन निघाला, निमित्त होते छत्रपती शिवराय यांची ३९०वि जयंती.
छत्रपती फाऊंडेशन, भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोलताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, उद्योगपती मनोज शिंदे आणि भारतीय वाणिज्य दूतावासात कार्यरत असलेले ए.के. विजयकृष्णन यांनी विशेष हजेरी लावली.
आज छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने कोलोरॅडो प्रांतात सुध्दा शिवजयंती साजरी होणार आहे. या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे आणि मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.