Home महाराष्ट्र आम्ही ठाकरे सरकार टिकू देणार नाही : नितेश राणे 

आम्ही ठाकरे सरकार टिकू देणार नाही : नितेश राणे 

0

नुकताच केंद्राचा तसेच महाराष्ट्राचाही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर अनेक राजकीय नेत्यांनी तसेच विरोधी पक्षाने वेगवेगळ्या स्वरूपाच्या टीकाटिप्पण्या केल्या. विशेषतः महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या तरतुदींवर बऱ्याच नेत्यांनी आपले मत मांडले व ठाकरे सरकारवर लक्ष्य साधत त्यावर टीकाही केल्या. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘फक्त कर्जमाफी करणार असे म्हणणारे सरकार आम्ही टिकू देणार नाही’ असे वक्तव्य केले. 

‘प्रभात’ च्या एका वृत्तानुसार कामशेत येथे पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेच्या उद्घाटनासाठी आमदार नितेश राणे उपस्थित होते. त्यावेळी भाषण देतांना त्यांनी अर्थसंकल्पावरून ठाकरे सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, “केंद्राच्या अर्थसंकल्पात सामान्य शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सोळा कलमी कार्यक्रम मांडण्यात आला. तर महाराष्ट्रात एक कलमी कार्यक्रम चालविला जातो आहे. महाराष्ट्रातील कर्जमाफीच्या ‘जीआर’मध्ये अंमलबजावणीच्या वेळेची निश्‍चिती नसून फक्‍त कर्जमाफी करणार असे म्हणणारे राज्य सरकार पाच वर्ष टीकणार नाही आणि आम्ही टिकू देणार नाही.” अशी माहिती प्रभातच्या रिपोर्टमधून मिळाली.