कोरोना विषाणूचा अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा फटका बसला असून महाराष्ट्र सरकारला आता त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या संबंधी कबुली दिली असून ते म्हणाले चार अत्यावश्यक सेवा वगळल्यास बाकीच्यांना पगार आम्हाला देणे शक्य नाही तसेच प्रलंबित होणारे पगार सुद्धा कपात करून दिले जातील.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे आणि ती पुढच्या डिसेंबरपर्यंत चालेल असं तज्ञ सांगतात, असं वडेट्टीवार म्हणाले, ” केंद्र सरकारकडून कोणतीही मदत झालेली नाही. पीएम केअर फंडाला मदत करा असं सांगणारे महाराष्ट्र द्रोही आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे अजुनही सत्ता गेल्याच्या शॉकमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत”
मदत व पुनवर्सन, आरोग्य आणि इतर दोन विभाग वगळता इतर विभागात वेतन कपात करणार पण, डॉक्टर, नर्स व त्यांच्याशी निगडीत असलेल्या करोना योद्ध्यांचे पगार दिले जाणार आहेत, अशी कबुली त्यांनी दिली असून पुण्यातील सारथी संस्थेला बंद न पडू देण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. या संस्थेसाठी यंदाही ५० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. सारथीचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत असे ते म्हणाले.