आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मोठी घोषणा केली आहे, राज्यात यापुढे लॉकडाऊन रहाणार नाही तर अनलॉकचे पुढचे टप्पे सुरू होतील. ते म्हणाले, ” राज्यातील रुग्णांची संख्या वाढते आहे याची अजिबात चिंता नाही पण मृत्यूचे प्रमाण वाढल्याची आहे”
जुलै आणि ऑगस्ट मध्ये कोरोनाचा धोका अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल आणि त्यासाठी अनेक आयसीयू बेड आणि डॉक्टर्स यांची संख्या वाढवत आहोत, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
आगामी काळामध्ये १ महिन्याच्या आत राज्यातील पंधरा ते सतरा हजार रिक्त जागांची पदं भरणार असल्याची माहिती सुद्धा राजेश टोपे यांनी दिली आहे राजेश टोपे म्हणाले, ‘रिक्त पदांचं आश्वासन आम्ही दिलं आहे. त्या भरतीचं धोरण ठरवण्यावर काम सुरु आहे.
तसेच राज्य सरकारनेही झपाट्याने अँटीबॉडी चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोविड-19 चाचणीचा निकाल लवकर मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी लवकरच 1 लाख अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. विशेषता आवश्यक सेवा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतरांवर ही चाचणी घेण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.