कोरोनाचा प्रभाव हा जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत कुठलीच शाळा उघडणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील परिस्थिती ही अट अतिशय गंभीर असून अशा वेळी शालेय शिक्षण मंडळाने नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याने पालक वर्ग पूर्णपणे चिंतेत आहे अशात अजितदादांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोना वाढत असताना शाळा सूरु करण्यात येत आहेत यावर सरकारची नेमकी भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार नसल्याचे स्पष्ट केले.
यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितले की,”आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, केंद्राकडून आपला टॅक्स येणे बंद झाले आहे. त्यामुळे आठ कोटीवर लागणारे व्याज आम्ही बँकांना देऊ. तशी हमी सहकार विभागाकडून दिली आहे. आम्ही पैसे देईपर्यंत आम्ही व्याज आणि मुद्दल देणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नवीन पिक कर्जचा प्रश्न सुटणार असल्याचे पवार म्हणाले. राज्यात काही जिल्ह्यात बोगस बियाणे देण्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महाबीजचे काही बियाणे उगावले नाहीत. कृषी मंत्री दादा भूसे यांनी पाहणी केली असून ज्या कंपनीने बोगस बियाणे दिले, त्यांनी तातडीने नवीन बियाणे देण्याच्या सूचना दिल्या आहेत”
यानंतर रामदेवबाबा यांच्या कोरोनवरच्या औषधाविषयी प्रतिक्रिया विचारली असता करताना सांगितले की,’बाजारात अनेकजण करोनावर औषध आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रामदेव बाबा यांनी करोनावर औषध आणलं आहे. ज्यांचा त्यांच्या औषधांवर विश्वास आहे त्यांनी ते घ्यावं’.