Home महाराष्ट्र आता शिवसेनेकडे दोन पर्याय : कुठलाही निवडला तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच!

आता शिवसेनेकडे दोन पर्याय : कुठलाही निवडला तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच!

0

शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सातत्याने चालू असलेल्या चर्चासत्रानंतर शिवसेने समोर दोन फोर्मिले ठेवण्यात आले आहे यापैकी कुठलाही एक त्यांना मान्य असल्यास सत्ता स्थापनेची पुढिल तयारी केली जाईल. या दोन फॉरमूल्यावर शुक्रवारी अर्थात आज मुंबईत बैठक घेऊन अंतिम निर्णया नंतर सत्ता स्थापनेची घोषणा होईल अशी माहिती मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार शरद पवार मुंबईत परतल्या नंतर रात्री उशिरा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांनी पवार यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. आता आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार असून, त्यासाठी आमदार येण्यास कालपासूनच सुरुवात झाली होती.

काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी शिवसेने समोर ठेवलेले दोन पर्याय / फॉर्म्युला

1.  पहिल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे देण्यात येतील आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या वाट्याला  उपमुख्यमंत्रिपदासह १५ व १३ मंत्रिपदे देण्यात येईल.

2. दुसऱ्या प्रस्ताव असा आहे की, शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी १४ मंत्री अर्थात मंत्री पदांच समसमान वाटप.

यात शिवसेनेने कुठलाही पर्याय निवडला तरी पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल हे निश्चित आहे. यंदा कदाचित जर शिवसेनेने हे दोनही पर्याय अमान्य केले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कडून मुख्य खाती मागण्यात येतील अशीही माहिती मिळत आहे आता पुढे नक्की काय होणार हे तर वेळच सांगेल.