Home महाराष्ट्र आता राजकीय पक्ष वा आघाडीसाठी सरकार स्थापनेचे निकष झाले कठोर : राष्ट्रपती...

आता राजकीय पक्ष वा आघाडीसाठी सरकार स्थापनेचे निकष झाले कठोर : राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचे परिमाण

0

सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यानं अखेर राज्यात मंगळवारी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावर मोहर लावत राज्यात राष्ट्रपती राजवटीला ग्रीन सिग्नल दिला. अशात शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर टीका शस्त्र उगारलं आहे.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सरकार स्थापनेचे निकष कठोर झाले आहेत. आता किमान १४५ आमदारांचा पाठिंबा असल्याशिवाय राज्यपाल कुठल्याही राजकीय पक्षाला वा आघाडीला सत्ता स्थापनेची परवानगी देणार नाहीत. त्यामुळे जर आता शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असेल तर काँग्रेसला जाहीर पाठिंबा देणे अनिवार्य राहील. सोबतच आता कोणत्याही राजकीय पक्षाला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी गैरहजर राहून सत्ताधारी पक्षांना मदत करण्याच्या सोयीचा मार्ग देखील बंद झाला आहे. सत्ता स्थापनेचा तिढा आता राजकीय पक्षांसाठी आणखीनच पेचाचा झाला आहे.