Home महाराष्ट्र “आता पक्ष बदलणार नाही. मी आणि माझे दोन्ही मुलं शेवटपर्यंत भाजपमध्येच राहणार”...

“आता पक्ष बदलणार नाही. मी आणि माझे दोन्ही मुलं शेवटपर्यंत भाजपमध्येच राहणार” – नारायण राणे

0

एकीकडे नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र पुढे हळूहळू त्यांनी भाजपशी जवळीक साधली ज्यामुळे त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. दुसरीकडे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना नारायण राणेंचे सुपुत्र नितेश व निलेश राणे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पुढे निवडणूक निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. परिणामी आता नारायण राणे व त्यांची मुलं ‘पुढे भाजपमध्ये राहणार का?’ असे प्रश्न उभे केले जात होते. त्यावर नारायण राणेंनी प्रकाश टाकत खुलासा केला आहे.

सिंधुदुर्गतील सावंतवाडी येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. “मी आता कुठल्याच पक्षात जाणार नाही, दोन पक्ष बदलले. आता यापुढे पक्ष बदलणार नाही.” असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं असून सोबतच, “मी आणि माझी मुलं कायम भाजपातच राहतील” असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.