Home महाराष्ट्र “आता कळलं असेल मराठा आरक्षण का आणि किती महत्वाचं होतं!”: छत्रपती संभाजी...

“आता कळलं असेल मराठा आरक्षण का आणि किती महत्वाचं होतं!”: छत्रपती संभाजी राजे

0

महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेत मराठा समाजातील १२७ तरुण अधिकारी झाले आहेत. संजमाध्यमांमधून या विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकाची थाप पडत आहे.
युवराज संभाजी राजेंनी फेसबुक वर पोस्ट टाकून सांगितले की ” आता सर्वाना कळले असेल की मराठा आरक्षण का आणि किती महत्वाचे आहे, मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”

महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या पदभरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारासाठी जागा राखून ठेवल्या गेल्या. राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास वर्गात नोकरीत १३ टक्के आरक्षण लागू केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १३ ते १५ जुलै २०१९ या दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे या परीक्षा केंद्रावर ४२० पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती.

अधिकारी झालेल्यांची संख्या:

  1. डेप्युटी कलेक्टर- 13
  2. डी. वाय.एस. पी. (DYSP) -11
  3. असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स – 3
  4. डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (Blog development officer) – 6
  5. असिस्टंट डायरेक्टर महाराष्‍ट्रा फायनान्स अँड अकाउंट सर्विस-2
  6. डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज (Deputy Director of Industries) ( Technical) – 1
  7. तहसीलदार – 22

8 . डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर महाराष्ट्र सर्व्हिस -12

  1. असिस्टंट रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (Assistant Reginol Transport Officer) – 1
  2. Section Officer -6
  3. असिस्टंट ब्लॉग डेव्हलपमेंट ऑफिसर (Assistant Blog Development Officer) – 2
  4. Deputy Superintendent of land Records – 3
  5. Deputy Superintendent of State Excies – 2
  6. Industries Officer (Technical) – 9

15) Assistant Project Officer / State Officer/ Administration Officer / Registrar -1

16) NAIB Tahsildar – 33

“मराठा आरक्षणामुळे जवळपास १२७ तरुण विद्यार्थी अधिकारी झाले. हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सर्वांच आहे. हे यश 50 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं त्यांच आहे. यावरच आपली लढाई थांबलेली नाही, अनेक जण उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी झाले. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवणे ही राज्य सरकारची आणि विरोधी पक्ष या दोघांची जबाबदारी आहे .आज हे अधिकारी बघितल्यानंतरमराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद अधिक आहे’, असं विनोद पाटील यांनी सांगितले .

http://www.facebook.com/story.php?story_fbid=1594865690671644&id=136216326536595&scmts=scwspsdd&extid=TpgcrYgSY6jGqa6b