Home महाराष्ट्र तुमच्यातील एक माणूस मला हवा आहे, म्हणून मी युती केली : उद्धव...

तुमच्यातील एक माणूस मला हवा आहे, म्हणून मी युती केली : उद्धव ठाकरे

0

प्राईम नेटवर्क : भाजप शिवसेनेच्या युतीच्या निर्णयां नंतर दोन्ही गोटात सध्या आनंदाचं वातावरण आहे, याच आनंदात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजप, शिवसेनेच्या आमदारांना वर्षा बंगल्यावर स्नेह भोजनासाठी आमंत्रित केलं होतं, या वेळी भोजनासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते.

भाजप मधील एका माणसाची मला गरज आहे

भोजनावेळी दोन्ही गोटांत, हास्याचं वातावरण रंगलं होतं, यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मी युती साठी का तयार झालो, हे अजून हि कोणाला खरं सांगितलं नाही, खरं, आम्हाला पण बारामती सह महाराष्ट्रात निवडणुका जिंकायच्या आहेत, त्या साठीच भाजप मधील एका माणसाची मला गरज आहे, तो माणूस मला निवडणूक जिंकून देऊ शकतो, यावेळी उद्धव ठाकरे यांनी तुमच्यातले गिरीश महाजन मला माझ्या मतदार संघात हवेत म्हटल्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार हसून प्रतिक्रिया दिली.

अशी यशस्वी शिष्टाई केली होती

भाजपचे गिरीश महाजन यांनी आत्ता पर्यंत, नाशिक, जळगाव येथील निवडणूका त्यासोबत अण्णा हजारेंचं उपोषण अशी यशस्वी शिष्टाई केली होती. याचाच दाखला देत, उद्धव ठाकरे यांनी हास्य कारंजे उडविले.