Home महाराष्ट्र “परप्रांतीय पळून गेले, आता मराठी युवकांनी या संधीचं सोनं करावं”: राज ठाकरे

“परप्रांतीय पळून गेले, आता मराठी युवकांनी या संधीचं सोनं करावं”: राज ठाकरे

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की त्यांनी सरकारला अनेक सूचना दिल्या आहेत, ” परप्रांतीय त्यांच्या गावी निघून गेल्याने महाराष्ट्रात प्रचंड रोजगार निर्माण झाला आहे. या निर्माण झालेल्या रोजगाराचा फायदा महाराष्ट्रातील तरुणांना मिळायलाच हवा”

ते परप्रांतीय महाराष्ट्रात परत जरी आले किंवा आणले गेले तरी त्यांच्या चाचण्या केल्याखेरीज त्यांना राज्यात येऊ देऊ नका असेही ते म्हणाले,” आपल्या राज्यात निदान चाचण्या होत आहेत, बाकीच्या राज्यांची काय परिस्थिती आहे कुणाला माहिती, त्यामुळे हे परप्रांतीय परत जरी आले किंवा आणले गेले तरी चाचणी केल्याशिवाय कुणालाही राज्यात घेऊ नका!”

परप्रांतीय गेल्यामुळे महाराष्ट्रातील कारखाने उद्योगधंदे बंद होऊ नये, यासाठी राज्यातील तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध असलेल्या ठिकाणापर्यंतची माहिती पोहोचवा. आपल्याकडे अनेकदा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी त्यांना रोजगाराबाबत माहिती नसते. त्यामुळे जर रोजगार उपलब्ध असले तर ते या मुला-मुलींना कळवावे.’

“भाजी विकण्यापासून इतर अनेक ठिकाणचे लोक बाहेर गेलेले आहे. ती संधी महाराष्ट्र शासनाकडे आहे, ती संधी घालवू नये,” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“प्रत्येक ठिकाणी माणुसकी माणुसकी असं नसतं. तुम्ही इतर ठिकाणी गेल्यावर ते तुमच्याकडे माणुसकी म्हणून बघत नाहीत. ते यंत्रणांप्रमाणे काम करतात,” असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हणाले.