Home महाराष्ट्र पु. ल. देशपांडेच्या हस्ताक्षराला मिळाले पुनरुज्‍जीवन, “पु.ल. १००” फॉन्ट चे अनावरण”

पु. ल. देशपांडेच्या हस्ताक्षराला मिळाले पुनरुज्‍जीवन, “पु.ल. १००” फॉन्ट चे अनावरण”

0

आज १२ जून म्हणजेच महाराष्ट्राचे स्मृतिशेष लोकप्रिय लेखक पू ल देशपांडे यांचा २० वा स्मृतिदिन. प्रेक्षक आणि वाचकांच्या मनावर पूलंच्या लेखणीने अधिराज्य गाजवले. पुलंना श्रध्दांजलीपर उपक्रम म्हणून त्यांच्या हस्ताक्षराचा फॉन्ट विकसित करण्यात आला असून आता आपल्याला पुलंच्या हस्ताक्षरात लिखाण करता येईल. पुणे येथील बी बिरबल या डिजिटल मीडियाच्या ग्रुपने सदर उपक्रम हाती घेतला होता आणि त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्त त्याचे अनावरण करण्यात आले आहे.

हा उपक्रम संपूर्ण सिद्धीस जाण्यासाठी जवळ जवळ वर्षभराचा कालावधी लागला असून, या टीम ने पुलंच्या लिखाणाचा अभ्यास केला आणि त्यांनी हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रत्येक अक्षराचा डिजिटल स्वरूपात उतरवण्याचा उपक्रम सुरू केला. या टीम मधील एकाने सांगितले की, ” महाराष्ट्रातील लोकांच्या मनात पुलंचे अढळ स्थान आहे, त्यांच्या लेखनावर महाराष्ट्राने अथांग प्रेम केले आहे. आताच्या लेखकांना पुलंचे लिखाण म्हणजे संदर्भाचा आणि नाविन्याचा मोठा खजिनाच आहे. यातूनच या फॉन्ट च्या निर्मितीची संकल्पना डोक्यात आली.”

पुलंच्या साहित्याचे सर्व मालकी हक्क हे Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA), Pune या संस्थेकडे असून या संस्थेने सुद्धा या font च्या निर्मिती साठी पाठिंबा दिला आहे. पुलंच्या १५० हुन जास्त लिखित साहित्य, स्वतः काढलेल्या नोट्स यांचा वापर करत अगदी वर्षभराच्या प्रयत्नानंतर पू ल १०० हा font विकसित करण्यात आला आहे. पूलंच्या हस्ताक्षराची खास बाब म्हणजे पुलंनी शब्दांवर कधीच आडव्या रेषा किंवा टोप्या ओढल्या नाहीत.