Home आध्यात्मिक तुकोबा आणि माऊलीं पालख्या सज्ज मात्र आळंदीमध्ये कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित!

तुकोबा आणि माऊलीं पालख्या सज्ज मात्र आळंदीमध्ये कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित!

0

पुणे येथून दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या तुकोबाराया आणि माऊलींच्या पालख्यांच्या प्रस्थानाला यावर्षी कोरोनामुळे थांबा मिळतो की काय या चिंतेत सर्व वारकरी सांप्रदाय होता आता मात्र ही काळजी काही अंशी मिटली आहे, पुण्याचे जिल्हाधिकारी श्री नवलकिशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातून पालखीच्या प्रस्थानाला संमती दिली आहे. त्यांनी अटी शर्थींसह आपण पालख्यांना परवानगी देत असल्याचे सांगितले.

यावेळी प्रस्थानाला परवानगी देण्यात आली असली तरी पालखी सोबत फक्त ५० वारकरी राहू शकतील तसेच सुरक्षित अंतर पाळत मास्कचा वापर बंधनकारक राहील असे नियम घालण्यात आले आहेत. तुकोबाराय पालखी प्रस्थान सोहळा १२ जून ला पार पडणार असून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा हा १३ जून रोजी होणार आहे.

दरम्यान शनिवारी होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळा परंपरेप्रमाणे होणार असला तरी आळंदी मंदिरात चार पुजारी पारंपरिक पद्धतीने प्रस्थानाचे उपचार करून पादुका अरफळकर महाराजांना देतील आणि नंतर 30 जून पर्यंत याच मंदिरातील सभामंडपात पादुका ठेवण्यात येणार आहेत . मंदिर परिसर कॉरंन्टाईन केल्यामुळे 30 जून पर्यंत मंदिर बंद राहील . यंदा कोरोनामुळे आळंदीत सर्व धर्मशाळा मठ बंद केल्याने जर कोणी वारकरी प्रस्थानासाठी बाहेरून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे खेड प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले आहे .