Home महाराष्ट्र पंकजा मुंडे भाषण करत असताना अचानक कोसळल्या: उपचार सुरू

पंकजा मुंडे भाषण करत असताना अचानक कोसळल्या: उपचार सुरू

0

आज विधानसभा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच नेत्यांची लगबग पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून नेते मंडळींची मोठी धावपळ चालू आहे. शक्य तितक्या ठिकाणी भेट देऊन सभा घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यातच आज भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अचानक स्टेजवर कोसळल्या. मीडिया न्यूज नुसार त्यांच्या भाषणादरम्यानच ही घटना घडल्याने घटनास्थळी एकच धावाधाव झाली. ही सभा परळीतील टॉवर परिसरात आयोजित करण्यात आली होती. पंकजा मुंडे अचानक खाली कोसळल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार पंकजा मुंडे केवळ नाश्ता करुन घराबाहेर पडल्या होत्या. त्यातल्या त्यात त्यांनी दिवसभर जेवणही केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना भोवळ आल्याचे समजले. एकंदरीत चालू असलेल्या धावपळ व जेवन न केल्याने त्या अचानक कोसळल्या. तसेच त्यांच्यावर उपचार चालू असून लवकरच त्यांना बरे वाटावे अशी अपेक्षा भाजपची मंडळी करीत आहेत.