Home महाराष्ट्र पंकजा मुंढे आणि एकनाथ खडसेंना हळूहळू पक्षातून बाहेर फेकण्याची खेळी?

पंकजा मुंढे आणि एकनाथ खडसेंना हळूहळू पक्षातून बाहेर फेकण्याची खेळी?

0

भाजपा नेत्या तसेच स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंढे यांच्या सुपुत्री पंकजा मुंढे यांनी काल मध्यरात्री ट्विट करत असे सांगितले की त्यांना विधानपरिषदेचे उमेदवारी पद मिळाले नाही यामुळे त्यांची पक्षावर कुठलीही नाराजी नाही.

त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन केले की, ” आपण एकमेकांच्या सहकार्यासाठी सदैव आहोत आणि आपल्या सगळ्यांना साहेबांचा आशीर्वाद आहे”, पण आधीच्या सरकारमधील मंत्री पंकजाताई या वर्षी परळीमधून पराभूत झाल्या आणि त्यांना पराभूत करण्यात त्यांनी स्वतःच्या पक्षाचाच हात असल्याचे म्हटले होते. यानंतर अनेक वेळा सदर मुद्द्यावरून पंकजा ताई यांनी त्यांना डावलले जात असल्याचे सांगत आल्या. आता मात्र विधान परिषदेवर जाण्याची सहज संधी सुद्धा भाजपने हिसकावून घेतली यावर त्यांनी हतबल होत पुढील ट्विट केले, ” माझ्याकडे आता सांगण्यासारखं काहीच नाही, सर्व ४ उमेदवारांना शुभेच्छा”

एकीकडे पंकजाताई नाराज नसल्याचे ट्विट करत असतांना NDTV नि दिलेल्या बातमीनुसार भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे मात्र त्यांना आमदारकी न दिल्यामुळे प्रचंड नाखूष आहेत. खडसेंनी सुद्धा त्यांना पद्धधतशीर डावलले जात असल्याचे या आधी सांगितले होते.

या आधीपासूनच नाराज असलेल्या नेत्यांना सहज देऊ शकले जाणारे आमदारकी पद न देऊन भाजपा काही वेगळा संकेत तर देत नाही आहे ना अश्या चर्चांना पेव फुटला असून, भाजप सरकार पंकजा ताई आणि खडसेंची कुठली परीक्षा घेत आहे असा सवाल विचारला जात आहे.