बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेने दावा केलेल्या कोरोना वरच्या औषधाला राजस्थान सरकार पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने सुदधा बंदी घातली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटर वरून या बद्दल माहिती दिली.
अनिल देशमुख यांनी ट्विट करून सांगितले की, ” जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(JNIMS) ने सदर औषधांच्या चाचण्या केल्या की नाही याची शहानिशा केली जाईल, तोपर्यंत कुठल्याही नकली औषधाला महाराष्ट्रात विकायला बंदी आहे”
जगभरात कोरोनावर अफाट संशोधन दिवसरात्र सुरू आहे तरीसुद्धा कुठलेही खात्रीलायक औषध सापडले नाही अशात रामदेव बाबांच्या पतंजली संस्थेने मंगळवारी कोरोनिल नावाचे औषध बाजारात आणले. त्यांनी JNIMS सोबत सर्व संशोधन करून हे औषध तयार केले असल्याचा दावा केला होता पण हा दावा JNIMS ने फेटाळून लावला आहे. ज्या औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्या फक्त सर्दी खोकल्या साठी होत्या, कोरोनाचा या औषधाच्या चाचणी आणि संशोधनात कुठलाही उल्लेख नाही. JIMS ने सदर स्पष्टीकरण दिल्यानंतर केंद्र सरकारने या औषधाला विरोध केला असून, राजस्थान आणि महाराष्ट्र सारकारने या औषधावर बंदी घातली आहे.
कोरोनिल हे औषध सगळ्यांसमोर आल्यानंतर काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयानं त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी”, असं सांगत केंद्र सरकारनं पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते.