Home महाराष्ट्र पुणे २० कोटींचे ड्रग्स वाहून नेणाऱ्या आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतले ताब्यात; २०...

२० कोटींचे ड्रग्स वाहून नेणाऱ्या आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतले ताब्यात; २० किलो ड्रग जप्त

0

पिंपरी चिंचवड येथे तब्बल २० कोटींचे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहेत. मीडिया न्यूजनुसार पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी २० कोटींचे २० किलो मेफेड्रोन हे ड्रग जप्त केले. या ड्रग्सचा संबंध बॉलिवूड प्रकरणाशी जोडण्यात येत आहे. घटनेशी संबंधीत पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

लोकसत्ताच्या मीडिया न्यूजनुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी, अक्षय काळे, संजीवकुमार राऊत, तौसिफ मोहम्मद तस्लिम अशी आहेत. यातील संजीवकुमार ४४ वर्षीय असून इतर आरोपी २५ ते ३१ या वयोगटातील आहेत. काल ७ ऑक्टोबरला पिंपरी चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरातील शेलारवाडी येथे एका अज्ञात गाडीचा पाठलाग केला. गाडीतील या ५ जणांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे तब्बल २० किलो मेफेड्रोन ड्रग सापडले.