Home महाराष्ट्र द्वेषकारक संदेश पाठवल्याबद्दल निलेश राणेंसह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल

द्वेषकारक संदेश पाठवल्याबद्दल निलेश राणेंसह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल

0

सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात द्वेषकारक संदेश पाठवल्याबद्दल निलेश राणेंसह दोन जणांवर बीड जिल्ह्यातील केज येथील पोलीस ठाण्यात काल अर्थात रविवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘सकाळ’च्या मीडिया न्यूजनुसार भाजप नेते निलेश राणे, विवेक आंबाड व रोहन चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांविरुद्ध द्वेष पसरवणारा मेसेज व्हाट्सएपवर पाठवल्याचे वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांच्या निदर्शनास आले. म्हणून त्यांनी केज पोलीस ठाण्यात संबंधित प्रकारची तक्रार केली. त्यामुळे निलेश राणे, विवेक आंबाड व रोहन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.