काल दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील गरिबांना अल्पदरात जेवण देण्याची तरतूद म्हणजेच शिवभोजन थाळी सुरू झाली आहे. दरम्यान काल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते एका ठिकाणी शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले. याच उद्घाटनावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून “१० रुपयांच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस!” अशा शब्दात आव्हाडांवर तोफ डागली आहे. अमेय खोपकर यांनी शेयर केलेली पोस्ट पुढील प्रमाणे…
शिवभोजनाचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशीचा आढावा पाहायचा झाला तर प्रभातच्या एक रिपोर्ट नुसार काल दिवसभरात सुमारे ११,२७४ थाळींनी गरिबांची भूक क्षमवली आहे. ज्यात सर्वाधिक विक्री ही ठाणे व नाशिक भागात झाली अशी महिती मिळत आहे. राज्यात १२५ केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था सध्या उपलब्ध असून थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या २ चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅम भात आणि १०० ग्रॅम एक वाटी वरण समाविष्ट करण्यात आले आहे. याला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यास शासन आणखी शिवभोजन केंद्र वाढण्यावर लक्ष केंद्रित करेल अशी माहिती मिळत आहे.