प्राईम नेटवर्क : माझ्यावर टीका करणाऱ्यांना ठोकून काढा, असं धक्कादायक विधान भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे. प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत असताना, पत्रकारांनी काही दिवसां पूर्वी तुमच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा मुद्दा त्यांच्या समोर मांडला, यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आपल्या गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची बाजू उचलून धरत, त्यांच्या मारहाणीचे समर्थन केले.
या मारहाणीचे समर्थन करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हुकूमशाही सरकार सत्तेवर आहे, त्यामुळे मला हि तसंच वागावं लागेल. जे माझ्यावर टीका करतात त्यांना, भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी विकत घेतल आहे, म्हणून या टीकाकारांना ठोकून काढणं योग्यच आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या धक्कादायक विधानानंतर पत्रकार गोंधळले होते, प्रकाश आंबेडकर हे सरकार विरोधात टीका करताना, खालच्या थराला जाताना दिसले, संविधान बचावाची भाषा करताना, त्याच संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असताना, चक्क मारहाणीचं समर्थन करणं म्हणजे दुतोंडी भूमिका घेण्या सारखं आहे.