Home महाराष्ट्र इतका कडक गांजा देशात आला कुठून : प्रशांत गंगावणे यांची आदित्य ठाकरेंविरोधात...

इतका कडक गांजा देशात आला कुठून : प्रशांत गंगावणे यांची आदित्य ठाकरेंविरोधात पोस्ट

0
Aditya Thackeray

मेट्रो कारशेड उभारण्यासाठी न्यायालयीन आदेशावरून आरेमधील हजारो झाडं कापण्यात आली हे तुम्हाला ठाऊकच असेल. याला अनेक लोकांनी, विविध क्षेत्रातील दिग्गजांनी नकार केला आणि शेवटी कोर्टाच्याच आदेशावरून वृक्षतोड थांबवण्यात आली. युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील आरेतील वृक्षतोडीला विरोध करताना म्हणाले होते की, “आमची सत्ता आल्यास आरेमधील वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करू.” त्यांच्या या वक्तव्यावरून हातकणंगलेमधील अपक्ष उमेदवार प्रशांत गंगावणे यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये आदित्य ठाकरे हे धूर काढताना दाखवण्यात आले आहेत. तसेच देशात इतका कडक गांजा येतो कुठून असा जोरदार टोला दिला आहे.

लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार प्रशांत गंगावणे यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले-कुलकर्णी यांनी त्यांना आचारसंहिता भंगाची नोटीस दिली आहे. तसेच २४ तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत त्यांनी खुलासा न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. आता ही टीका पुढे काय वळण घेणार हे वेळच ठरवेल.