Home महाराष्ट्र महाराष्ट्रातही मिळणार ऑनलाइन पीयुसी!

महाराष्ट्रातही मिळणार ऑनलाइन पीयुसी!

0

बोगस कागदपत्रांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण पाहता आता दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही ‘ऑनलाइन पीयूसी’ (पोलुशन अंडर कंट्रोल) देण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारपासून अर्थात काल पासून याची सुरुवात झाली असून यापुढे कोणीही बोगस प्रमाणपत्र काढण्याचा प्रश्नच नाही.

लोकमत मीडिया न्युज नुसार ‘लोकमत’च्या वृत्ताने ऑनलाइन PUC चा निर्णय तातडीने घेतल्याची माहिती महाराष्ट्राचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रावते यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाहनाचे पीयूसी देणाऱ्या सर्व केंद्रांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांचे साहित्य ताब्यात घेतले आहे. असा प्रकार अन्यत्र कुठे घडला आहे का, हे शोधण्यासाठी पथके कार्यरत केली आहेत.” या निर्णयानंतर अपेक्षा आहे की बोगस कागदपत्रांचे प्रमाण कमी होईल.