Home महाराष्ट्र पुणे पुण्यात सुनेने बॉयफ्रेंड सोबत मिळून सासरी केली १.७५ करोड ची चोरी

पुण्यात सुनेने बॉयफ्रेंड सोबत मिळून सासरी केली १.७५ करोड ची चोरी

0

पुणे येथे चोरीचा एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मोठा कट रचला, अन् आपल्या सासरीच्या घरी चोरी घडवून आणली. या महिलेने प्रियकराच्या मदतीनं दागिने आणि रोकडसह सुमारे १ कोटी ७४ लाख रुपये लंपास केले. चोरीचा कट रचताना त्यांनी तिजोरीच्या बनावट चाव्या तयार केल्या आणि घरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरा दुसर्‍या बाजूस वळवला. यावेळी मात्र सीसीटीव्ही कॅमेर्‍यानं महिलेची पोलखोल केली.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या महिलेला अटक केली आहे, तर तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.

हे प्रकरण पुण्यातील बीवेवाडी येथील आहे. अक्षय दिलीप भंडारी नावाच्या व्यक्तीनं घरात दागिन्यांसह रोख रक्कम चोरी केल्याचा गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितले.तक्रारीत त्यानं सांगितले की लोकेश सोसायटीच्या गायत्री अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर एकमध्ये तो आपल्या कुटूंबासह वास्तव्यास आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी त्याच्या लहान भावाचे मृणालशी लग्न झालं होतं. अक्षय मसाल्यांचा व्यवसाय करतो, त्यामुळं घरातच दागिने आणि रोकड ठेवली होती.

अक्षयने सांगितले की मृणालने आपल्या प्रियकरसोबत घरातून दागिने व रोकड चोरली. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं हे प्रकरण उघडकीस आले. सीसीटीव्हीमध्ये एका महिलेचा हात दिसत आहे जी कॅमेरा फिरवत होती, मृणालचं असल्याचं दिसून आले. दरम्यान कुटुंबाची बदनामी होण्याच्या भीतीने त्याने मृणालला समजावून सांगितले आणि पोलिसांत तक्रार दिली नाही. घरच्यांनी मृणालचा प्रियकर बुबाने याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. इथं मृणालच्या वागणूकीत कोणताही बदल झाला नाही. शेवटी कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार करावी लागली.

दरम्यान या बुबाने नावाच्या व्यक्तीशी मृणालचे अनेक वर्षांपासूनचे संबंध होते आणि तिच्या मनाविरुद्ध लग्न करून तिला अक्षयच्या घरी आणण्यात आले होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. बुबाने नावाच्या व्यक्तीचा सद्या शोध सुरू असून, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.