पुण्यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तीस वर्षाच्या दाम्पत्याने आधी दोन लहानग्यांना फासावर लटकवून मग स्वतः आयुष्य संपवले. संपूर्ण दिवस दरवाजा न उघडल्यानं शेजाऱ्यांना शंका आल्याने प्रकार उघडकीस आला.
अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत. शिंदे कुटुंब सुखसागर नगर गल्ली नं १ मध्ये राहत होते.
पोलिसांनी शेजाऱ्यांच्या माहितीवरून घराचा दरवाजा तोडून बघितल्यावर झालेला प्रकार उघडकीस आला. शिंदे दाम्पत्य मुलांचे identity card बनवून देण्याचा व्यवसाय करत होते आणि लॉकडाऊन मूळे रोजगार संपुष्टात आला त्यामुळेच उपसमारीमुळे कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगीतले जात आहे.
पुण्याचा ससून हॉस्पिटलने सांगितले की लॉकडाऊन काळामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यांना दर महिन्याला चाळीस ते पन्नास आत्महत्या केलेल्या प्रेतांवर शवविच्छेदन करावे लागत असल्याचे ते सांगतात. लॉकडाऊन काळाच्या अगोदर ससून ला येणाऱ्या आत्महत्या मृतदेहांची संख्या ही सरासरी वीस एवढी होती असे ससून हॉस्पिटलने सांगितले.