Home महाराष्ट्र पुणे ऑटोमॅटिक पाणीपुरी देणारी ही मशीन पाहिलीत का? पुण्यातील एक अनोखा व्यवसाय!

ऑटोमॅटिक पाणीपुरी देणारी ही मशीन पाहिलीत का? पुण्यातील एक अनोखा व्यवसाय!

0

पाणीपुरी म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने बाहेरचे अन्न खाणे लोक टाळत आहेत. त्यातल्या त्यात पाणीपुरी देणारे जास्त स्वच्छता पाळत नसल्याने पाणीपुरी प्रेमी आरोग्याच्या दृष्टीने पाणीपुरी खाण्याचं टाळत आहेत. या बाबीचा विचार करून पिंपरी चिंचवड येथील तरुणांनी हात न लावता स्पर्षरहीत व ऑटोमॅटिक पाणीपुरी देणारी मशीन बनवली आहे. या मशीनमुळे स्वच्छ व हायजिनिक पाणीपुरी ग्राहकांना मिळत आहे. या मशीनचे नावीन्य पाहण्यासाठी तसेच तेथील पाणीपुरी चाखण्यासाठी पिंपरी चिंचवडकर मोठ्या संख्येने जात आहेत.

लोकसत्ताने युट्युबवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये ही मशीन आपल्याला पाहता येईल. लोकसत्ताच्या मीडिया रिपोर्टनुसार या मशीनची संकल्पना बनवणारे पाच तरुण उच्च शिक्षित आहेत व मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात. त्यांच्या घरातील स्त्रिया हा व्यवसाय सांभाळत आहेत. तेथे काम करणारे सर्व लोक प्रत्येक वस्तू हातात प्लास्टिकचे ग्लोव्ज घालून हाताळतात. ही मशीन सेन्सरवर काम करते. नोझलच्या खाली पुरी पकडली की त्यात आपोआप पाणी पडते आणि आपण हात बाजूला केला की पाणी थांबते. अशा प्रकारची मानवी स्पर्शविरहित ही मशिन असल्याने यातून कोरोनाच्या संसर्गाचा अजिबात धोका नाही आणि त्यामुळेच जास्तीत जास्त ग्राहकांचा या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतोय.