Home महाराष्ट्र पुणे पुण्यातील निर्बंध होणार अजून शिथिल, कंटेन्मेंट झोन सुद्धा हटवणार?

पुण्यातील निर्बंध होणार अजून शिथिल, कंटेन्मेंट झोन सुद्धा हटवणार?

0

पुणे शहर पुन्हा एकदा पूर्वगत होत आहे. पण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढतचं चालली आहे. त्यामुळे शहरात १५ जूनपासून पुन्हा कडक लॉकडाउन लागू होणार अशी चर्चा रंगात आली होती. पण पुण्यात प्रतिबंधित क्षेत्र पुण्यात प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कन्टेन्मेंट झोन्सची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यानुसार निर्बंध आणखी शिथील होण्याची शक्यता आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात सर्व प्रकारच्या व्यापाराची दुकानं उघडायची का नाही याचा निर्णय प्रतिबंधित क्षेत्र पुनर्रचना झाल्यावर ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुढच्या १ ते २ दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनच्या काळात ज्या भागात जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. आता पुण्यात जो भाग आधी ग्रीन झोनमध्ये होता तिथेही रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे ज्या ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येईल, त्या भागाची परिस्थिती लक्षात घेऊन कंटेन्मेंट आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून नव्याने त्या परिसराची रचना करण्यात येईल, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली. या बाबतचा आदेश हा सोमवारी दिनांक १५ जून रोजी काढण्यात येणार आहे, असंही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना केसेस पैकी ७० टक्के केसेस निकाली निघाल्या असून आता फक्त ३० टक्के कोरोना केस शिल्लक राहिल्या आहेत. शहरातील ६५.२ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे तर ४.७ टक्के रुग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. पुणे शहरात आज (शनिवारी) २५४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ३३६ वर पोहचली आहे. शहरात आज १६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत शहरातील कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची संख्या ६ हजार ८७ झाली आहे.