Home आरोग्य पुण्यात कडक लॉकडाऊनचा इशारा, फुकट रस्त्यांवर फिरल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो

पुण्यात कडक लॉकडाऊनचा इशारा, फुकट रस्त्यांवर फिरल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो

0

शासनाने लॉकडाऊन शिथिल करत अनेक गोष्टींना सशर्त परवानगी दिली आहे मात्र पुण्यात या गोष्टीचा लोक गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की नियमांचे पालन झाले नाही तर पुणे १००% लोकडाऊन करावे लागेल.

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसंच ग्रामीण भागात अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचं निदर्शनास येत आह, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 20 दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात ५ पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितले.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आज तेथील जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाऊन आणि नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला सुरवात केली असून, पुणे जिल्ह्यात याच धर्तीवर कडक नियम आणि लॉकडाऊन राबवणार असल्याची चर्चा सुरू आहे.