Home महाराष्ट्र पुणे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये शेवटचा लॉकडाऊन, यानंतर कधीच लॉकडाऊन लागणार...

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये शेवटचा लॉकडाऊन, यानंतर कधीच लॉकडाऊन लागणार नाही : जिल्हाधिकारी राम

0

पुण्यामध्ये मिशन बिगीन अगेन केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव हा प्रचंड वाढीस लागला होता, नाईलाजाने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावावा लागला. या कडक लॉकडाऊन मध्ये जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्वांना सहकार्याबद्दल धन्यवाद म्हणत ही मोठी घोषणा केली आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले, “पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये जुलै २३ तारखेनंतर कुठलाही लॉकडाऊन नसणार असून त्याची चिंता जनतेने सोडून द्यावी. आम्ही जाहीर केलेल्या कडक लॉकडाऊन मध्ये जनतेने उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे आम्हाला परिस्थती आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली आहे”.

लॉकडाऊन हा जुलै २३ तारखेनंतर असणार नाही असे असली तरी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे हे सर्वांसाठी बंधनकारक असणार असून कुणीही त्या नियमांचे उल्लंघन करू नका अशी विनंती जिल्हाधिकारी यांनी केली आहे. राज्याने जरी राज्यात बिगीन अगेन ची घोषणा केली असली तरी जिल्हा पातळीवरील परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी यांना लॉकडाऊन कडक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांचा वापर करून विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी त्यांच्या येथील परिस्थिती लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता किंवा कठोरता आणत आहेत. पुण्यातील परिस्थिती आता हळू हळू कोरोना प्रादुर्भाव पासून कमी होत जावो ही प्रार्थना प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती करत आहे.