Home महाराष्ट्र राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची घेतली भेट: विखे...

राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची घेतली भेट: विखे पाटील काँग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा

0

सत्तेतून बाहेर पडल्याने आता एक एक करून भाजपला अनेक धक्के बसत आहेत. भाजपच्या मेगाभरती दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या जेमतेम सर्वांनीच काढता पाय घेतला आहे अशी चर्चा चालू आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील देखील परतीच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षात परत यावे अशी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची देखील इच्छा आहे अशी माहिती मिळत आहे.

कट्टा या वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्ट नुसार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली असून यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र तरीदेखील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. ‘विखे पाटील’ काँग्रेस मध्ये परतणार अशी चर्चा आहे. विखे पाटलांनी ठरवले तरी त्यांना परत पक्षात घ्यायचे की नाही हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व अध्यक्षा सोनिया गांधी यांचाच काय तो अंतिम निर्णय असेल अशी माहिती मिळत आहे.