Home महाराष्ट्र १७ ऑक्टोबरपासून महिलांसाठी लोकल सुरु करण्याच्या राज्य सरकारच्या विनंतीला रेल्वे प्रशासनाचे उत्तर

१७ ऑक्टोबरपासून महिलांसाठी लोकल सुरु करण्याच्या राज्य सरकारच्या विनंतीला रेल्वे प्रशासनाचे उत्तर

0

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा महिन्यांपासून लोकल ट्रेन्सची वाहतूक बंद करण्यात आली होती. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून केवळ अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कामगार यांच्यासाठीच लोकल्स सुरु करण्यात आल्या. मात्र सर्वसामान्यांसाठी अद्याप लोकलची सेवा चालू झालेली नसल्याने त्यांचे कामावर जातांना खूप हाल होत आहेत. त्यातल्या त्यात महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही बाब लक्षात घेऊन लक्षात घेऊन राज्य सरकारने महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती रेल्वे प्रशासनाला केली आहे. १७ ऑक्टोबरपासून अर्थात नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून महिलांना दोन टप्प्यांत लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशा आशयाचे विनंतीपत्र रेल्वे प्रशासनाला दिले आहे असे लोकमतच्या मीडिया न्यूजवरून समजले. मात्र याबद्दल तातडीचा निर्णय घेणे व १७ ऑक्टोबरपासून लगेच परवानगी देणे शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला सांगितले. तसेच यासाठी आधी प्रवाशांचे मूल्यांकन व योग्य नियोजन करणे गरजेचे आहे असेही रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले.