Home महाराष्ट्र राज ठाकरेंचे कट्टर समर्थक नितीन नांदगावकर शिवसेनेत…

राज ठाकरेंचे कट्टर समर्थक नितीन नांदगावकर शिवसेनेत…

0

विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्षांमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक अनपेक्षित लोक पक्षांतर करत असतांना मनसेलाही असाच एक मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अर्थात सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थळी म्हणजेच ‘मातोश्री’ येथे जाऊन शिवबंधन बांधून घेतले व शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी नितीन नांदगावकर यांच्यासह वरुण सरदेसाई मातोश्रीवर उपस्थित होते.

नितीन नांदगावकरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला असला तरी त्यांना उमेदवारी मिळणार का या प्रश्नाचं उत्तर अद्याप गूढ आहे. आपल्या धडाकेबाज व्यक्तिमत्वामुळे सोशल मीडियावर फेमस असणारे नितीन नांदगावकर कायम रिक्षा/टॅक्सी चालक व परप्रांतीयांच्या मनमानी विरोधात आवाज उठवत आले आहेत. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे त्यांच्या फॅन्सचे लक्ष लागले आहे.